1001marathiessay.blogspot.com

|vanbhojan nibandh  in marathi
vanbhojan marathi nibandh
     
       प्रिय मित्रांनो निबंध लेखन ही एक फार महत्वपूर्ण कला आहे . कारण की आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्याला याचा उपयोग होतो. ज्याच्याकडे निबंध कला आहे तो कोणतीही  घटना विस्तारपूर्वक व जशीच्या तशी इतरांना सांगू शकतो .हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. निबंध कला  विकसित करण्यास निबंध लिहिण्याचा सराव केला पाहिजे . विविध निबंध वाचले पाहिजेत.
        तसंच हा खालील निबंध  तुम्ही वाचा व वाचून झाल्यानंतर तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा.
                       
      भोजन तर आपण सर्वच करतो आणि करत राहणार . प्रत्येकाने कधी ना कधीतरी वनभोजनाचा आनंद घेतलेला असतो.वनभोजनाचे हे प्रसंग मनामध्ये आजन्म स्थान करून राहिलेले असतात.

                असाच एक छान मराठी निबंध वनभोजन  vanbhojan nibandh  in marathi  आपण बघूया. यालाच तुम्ही |My trip short essay on Marathi म्हणूनही लिहू शकतो .
              

 वनभोजन
 |vanbhojan nibandh  in marathi 

|आमची सहल |


          नमस्कार मित्रांनो माझ नाव आराध्या आहे. मी आज तुम्हाला आमच्या वनभोजनाविषयी सांगते. तसं आम्ही वनभोजनासाठी फार लांब गेलो नव्हतो. लांब गेलो नसलो तरी मजा मात्र खूप आली होती. याचं कारणही तसंच आहे .           

            वनभोजनासाठी आम्ही गेलो होतो आमच्या शेतात .आमच्याबरोबर आमचे आजी -आजोबा सुद्धा होते. माझ्या वर्गातील आम्ही मैत्रिणी त्यांच्या आजी-आजोबांसह व एक-दोन मैत्रिणींचे आईवडील देखील वनभोजनासाठी आले होते. आमचा हा आगळा वेगळा कार्यक्रम असा ठरला की ,आमच्या शाळेची सहल गेलेली होती, बरेच मुलं शाळेला गेलेले असल्यामुळे व काही शिक्षकही सहलीला गेलेले असल्यामुळे शाळेत फारसे अध्यापनही होत नव्हते .त्यावेळी आम्ही   नऊ मुलींनी शिक्षकांची परवानगी घेतली व दोन दिवसासाठी शाळेतून सुट्टी मिळवली. घरी आल्यावर प्रत्येकीने आपापल्या घरात वनभोजन संबंधी सांगितले. मैत्रिणींच्या घरातील वरिष्ठ वडीलधारी मंडळीही वनभोजनासाठी तयार झाली .एका मैत्रिणीच्या घरच्या मंडळींनी नकार दिला होता  , परंतु माझ्या आजोबांनी त्यांना फोन करून त्यांना येण्यासाठी सांगितल्यावर तेही तयार झाले .

          वनभोजनासाठी आम्ही बुधवारचा दिवस निवडला .आदल्या दिवशी मंगळवारी शाळेतून घरी आल्यानंतर प्रत्येकी नाही एकत्र येऊन वनभोजनासाठी काय काय साहित्य लागते ? याची यादी तयार केली . कोणी कोणते साहित्य आणायचे याची विभागणी करण्यात आली. 


         वनभोजनाला जायचे कुठे ? हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या गावाभोवती असलेल्या तीन-चार प्रेक्षणीय स्थळांच्या नावांच्या चिठ्ठ्या बनवल्या . त्यातून चिट्ठी निघेल त्या ठिकाणी वनभोजनासाठी जायचे असे ठरले. त्यातच आमचे शेतही बरेच मोठे असल्याने आमच्या शेतात खूप झाडे लावलेली आहेत .फळाफुलांची ऋतूनुसार झाडे लावली आहेत , त्यामुळे कोणत्याही ऋतूत  त्या-त्या ऋतूतील फळ खाण्यासाठी उपलब्ध असते. म्हणून एक चिठ्ठी आमच्या शेताच्या नावाचीही केली होती .गमत म्हणजे  नेमकी तीच चिठ्ठी निघाली . त्यामुळे माझा आनंद खूपच वाढलेला होता.

           ज्यावेळी कामांची वाटणी करण्यात आली, त्यावेळी उत्साहाच्या भरात बऱ्याच कामांची जबाबदारी मी स्वीकारली होती ,परंतु प्रत्यक्ष काम करताना मात्र माझ्या नाकी नऊ आले .त्यावेळी माझ्या इतर मैत्रिणींनी मला मदत केली.शेवटी मित्रच अडचणीत कामात येतात ना ! याचा मला अनुभव आला. 

        साहित्य बरेच  झाल्यामुळे जड झाले होते .हे साहित्य आमच्या शेतापर्यंत नेणे  म्हणजे तारेवरची कसरतच होती. परंतु वनभोजनाचा आनंद कष्टाशिवाय येणार कसा. जे जड साहित्य असेल ते साहित्य पप्पांनी गाडीवरून आमच्या शेतात पोचवून दिले .

            आमच्याबरोबर सर्वांचे आजी किंवा आजोबा असल्यामुळे त्यांच्या आवडी- निवडीने व त्यांना पचतील  असे साधे पदार्थ  करण्याचे ठरवले होते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्रमांक होता तो खिचडीचा  कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा खाद्य पदार्थ ,तर दात नसलेल्या आजी-आजोबांसाठी वरण- भाताचा ही बेत  केलेला होता.

         माझ्या आईने रात्रीच  सर्वांसाठी छान गुलाबजाम बनवून ठेवलेले होते . गुलाबजाम इतके छान झाले होते की ,माझ्या आजोबांना मधुमेहाचा त्रास असतानाही पप्पांची नजर चुकवून आजोबांनी दोन-तीन गुलाबजाम खाल्ले ,पण नंतर मात्र मी आजोबांना दिले नाही .

        जेवण बनवत असताना आम्ही मनोरंजनासाठी वेगवेगळे खेळ खेळत होतो. कोणी शिवाशिवीचा खेळ खेळत होते ,कोणी लंगडी  खेळत होते ,तर कोणी लपाछपी खेळत होते. आमच्याबरोबर आलेली ही वरिष्ठ वृद्ध मंडळी देखील त्यांचं वय विसरून बालपणात असल्यासारखे वागत होते .कुणी त्यांच्या बालपणाच्या गोष्टी सांगत होते तर कुणी त्यांच्या फजितीही सांगत होते . फारच मजेशीर पद्धतीने वातावरण निर्मिती झाली होती.

        आनंदाचे हे सर्व क्षण जपून ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मध्ये भरपूर फोटो काढले . कोणी शूटिंग केले. बनवलेल्या जेवणाचे देखील फोटो आम्ही काढले .आमच्या आयुष्यातील अगदी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच तो दिवस होता .जो आम्ही कधीही विसरणार नाही .

      जेवण झाल्यानंतर मात्र आम्हाला सुस्ती आली .मग काही मैत्रिणी तिथं आंब्याच्या झाडाखाली झोपल्या .तर कोणी आंब्याच्या झाडावरून कच्च्या कैऱ्या तोडून आणल्या .मस्तपैकी त्यावर मीठ आणि चटणी टाकून मिटक्या वाजवत आमच्यासमोर खाऊ लागल्या .आमच्या तोंडाला खूपच पाणी सुटले. मग आम्ही ही त्यांच्यातल्या हिसकावून खायला सुरुवात केली .खूपच मजा आली .

       अशा खेळीमेळीच्या वातावरणात सायंकाळचे पाच- सहा केव्हा वाजले हे आम्हाला कळलेच नाही .तेव्हा पप्पांनी आम्हाला "आता गेले पाहिजे "असे सांगितले. मग जेवणाची सर्व भांडी  पटकन आवरून सहा वाजेला आम्ही परतीच्या मार्गाला लागलो .सात वाजेपर्यंत आमच्या घरी परतलो.मनात आठवणींचा समुद्र घेऊन .

     प्रिय मित्रांनो तुम्हाला निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही हा निबंध वाचता यावा म्हणून त्यांनाही निबंध शेअर करा.

|My trip short essay on Marathi


vachniy marathi lekh
वाचनीय मराठी लेख 

2 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने